ad here
1.3K Download
3 years ago
जल प्रदूषण प्रकल्प PDF Free Download Water Pollution Is The Pollution Of Water Sources. Water Pollution Is A Man-made Problem. Air – Water – Food Is The Second Most Important Need Of A Human Being. Getting Your Water Clean And Pure Is Very Important From A Health Point Of View. Contaminated Water Causes Stomach Upset And Many Other Ailments. There Are Many Causes Of Water Pollution And We Are Responsible For It.
This Is A Serious Environmental Problem Facing The Whole World. Due To Water Pollution, Substances With Certain Properties Are Mixed In The Water To Such An Extent That It Changes The Natural Quality Of The Water And Makes It Unusable. Water Pollution Affects The Health Of Living Things Or The Taste Of Water, It Looks Dirty Or Smelly.
Human Actions And Other Factors Directly And Indirectly Alter The Natural Quality Of Water And Make It Unusable For Any Purpose. This Water Is Called Polluted Water. Water Pollution Is A Process That Adversely Affects Human And Aquatic Life By Altering The Natural, Chemical And Biological Properties Of Water.
If Any Foreign Substance Or Heat Is Added To Natural Water, It Pollutes The Water And Harms Humans, Other Animals And Aquatic Life. Water Pollution Has Become A Serious Problem In Most Countries Of The World. Canada, China, India, Japan, Russia, Usa Etc. This Problem Is Acute In Many Countries.
‘जल प्रदूषण’ हा प्रकल्प करीत असताना मी प्रकल्पाची माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा उपयोग केला तसेच इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून प्रकल्पाची माहिती संकलित केली. प्रकल्पाच्या विषयानुसार पाण्याचा मोठ्या प्रमाणात होत असेलेल जल प्रदूषण आणि त्यामुळे होत असलेले मानवी जीवनावर परिणाम तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यावरील माहिती मिळविण्यासाठी मी मुलाखत, प्रश्नावली व क्षेत्रभेट या कार्यपद्धतीचा अवलंब केला.
या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील वाढत्या जल प्रदूषण पातळी बाबत प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले.
तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
जल प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणात्मक समस्या आहे . पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते . पाण्याला रसायनांचा राजा असे म्हटले आहे . हे एक निसर्गातले आश्चर्यकारक रसायन असून हजारो पदार्थांना स्वतः मध्ये सामावून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ‘ वैश्विक दावण ‘ ( Universal Solvent ) असे म्हटले आहे . पाणी म्हणजे संजीवनी . पाण्याला खूप उपमा दिल्या आहेत . एकवेळ मानव अन्नाशिवाय जगू शकतो पण पाण्यावाचून तो जगू शकत नाही . पण हेच पाणी प्रदूषित झाले तर मानवाला मृत्युसुद्धा येतो . अनेक मानवेतर सजीव देखील दूषित पाण्यामुळे उध्वस्त होतात . म्हणूनच ‘ जल प्रदूषणाचा ‘ गांभीर्याने विचार करणे आवश्यक ठरते . जलप्रदूषणाचा अर्थ खालीलप्रमाणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे . ” मानवी आरोग्य किंवा कोणत्याही सजीवास किंवा मानवी संपत्तीस धोकादायक ठरू शकणाऱ्या पाण्याच्या भौतिक रासायनिक किंवा जैविक गुणधर्मात होणाऱ्या बदलास जलप्रदूषण असे म्हणतात .
पृथ्वीवर १४१ कोटी घन कि.मी. जलसाठा आहे. त्यापैकी ९७ % पाणी क्षारयुक्त सागरजल म्हणून उपलब्ध आहे . उरलेल्या पाण्यापैकी २.११ % पाणी बर्फ / हिमाच्या घनरुपात व केवळ ०९ % पाणी गोड्या पाण्याच्या किंवा पिण्यायोग्य पाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात आहे . हे ०.९ % पाणी नद्या , विहीरी, तलाव , सरोवरे यांच्यामध्ये आढळून येते .
पाणी प्रदूषित झाले की त्यामधील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊ लागते . युरोपमधील अनेक देशांची जीवनरेषा समजली जाणारी र्हाईन नदी खूपच दूषित झाली आहे . भारतातील गंगा आता गटारगंगा झाली आहे .
O.S. South wick (New York) ) ने जलप्रदूषणाची केलेली केलेली व्याख्या :
” जलप्रदूषण म्हणजे पाण्याचे प्राकृतिक रासायनिक जीवशास्त्रीय गुणधर्म मानवी हालचालींमुळे ( क्रियांमुळे ) व नैसर्गिक प्रक्रियांद्वारे मलिन / नष्ट होतात व पाणी घाणेरडे , विषारी होते .
“W.H.O. 1996 मध्ये केलेली व्याख्या ( World Health Organization):
” नैसर्गिक किंवा इतर बाह्य पदार्थांच्या मिश्रणाने पाणी अस्वच्छ विषारी , घाण होते , पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते व त्या पाण्यामुळे सजीवांना अपाय होतो त्यामुळे साथीचे रोग पसरतात . त्याला जलप्रदूषण म्हणतात .अशा विविध व्याख्यातून जलप्रदूषणाचा अर्थ स्पष्ट होतो . जलप्रदूषणाचा गंभीर अध्ययन आवश्यक आहे . याचसाठी जलप्रदूषणाच्या कारणांचा मागोवा घेणे आवश्यक ठरते .
जलप्रदूषण कारणे
अनेक अभ्यासक संशोधकांनी जलप्रदूषणाची सांगितलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत .
नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन प्रकारची कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत .
१ . नैसर्गिक कारणे
१ ) अतिपाऊस
२ ) सेंद्रीय पदार्थांचे विघटन
३ ) भूकंप
४ ) ज्वालामुखी
५ ) पूर
६ ) उल्कापात
७ ) वादळे वगैरे
अशी कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात .
मानवनिर्मित कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे . कारण निसर्गनिर्मित कारणापेक्षा मानवनिर्मित कारणे ही मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला जबाबदार असतात . ती कारणे व त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे .
२.मानवनिर्मित कारणे :
१ ) मानवी वसाहतीतील दैनंदिन व्यवहार
२ ) कारखानदारी / वाढते औद्योगिकरण
३ ) शेतीतील जंतूनाशके किटकनाशकांच्या अतिरिक्त फवारणी / हरितक्रांती.
४ ) रासायनिक खतांचा वापर
५ ) सागरी वाहतूक
६ ) प्लॅस्टिक व केरकचरा जलाशयात विसर्जन
१ ) अतिप्रमाणातील पाऊस : पाऊस जर अतिप्रमाणात पडत असेल तर जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते . नद्या त्यांच्या मर्यादेच्या पातळीपेक्षा वर जाऊन जमिनीवरील धूळ , घाण , कचरा , टाकाऊ पदार्थ पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होते .
२ ) सेंद्रिय पदार्थाचे विघटन : ” विघटन ‘ ही एक महत्त्वाची नैसर्गिक किचकट प्रक्रिया आहे . अनेक सजीवांचे मोठ्या प्रमाणात जमिनीवर , पाण्यात विघटन चालू असते . विघटन म्हणजे कुजण्याची प्रक्रिया यामुळेही मोठ्या प्रमाणात जीवाणू , विषाणूंची निर्मिती होऊन पावसामुळे हे पदार्थ जमिनीवरून पाण्यात मिसळतात व जलप्रदूषण घडून येते .
३ ) भूकंप : बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा जगभरात भूकंप घडत असतात . यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व इतरही हानी होतेच पण त्याच वेळी अनेक सजीवांच्या विघटनाची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात होते . पडझडही मोठ्या प्रमाणात झाल्याने जलप्रदूषणाला चालना मिळते . म्हणजे भूकंप हे ही नैसर्गिक कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते .
४ ) ज्वालामुखी : ज्वालामुखी ही नैसर्गिक कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते . विशिष्ट परिस्थितीत जमीनीतील ज्वालारस ज्यावेळी पृथ्वीच्या पोटातून मोठ्या प्रमाणात उसळून बाहेर येतो तेव्हा त्याला ज्वालामुखी असे म्हणतात . यामुळे ही पृथ्वीच्या पोटातील विविध विषारी रसायने पृथ्वीतलावर येतात व पृथ्वीवरील व आतील अशी अनेक विघातक घटक विविध प्रकारे पाण्यात मिसळून पाण्याचे प्रदूषण होते .
५ ) पूर : पुर ही नैसर्गिक परिस्थिती जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते . अतिपावसाचाच हा परिणाम .
१) रासायनिक खतांचा वापर : हरित क्रांतीमुळे केवळ किटकनाशकांचा शोध लागला नाही तर भरघोस पीक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होऊ लागला . जास्त पिकाच्या हव्यासापोटी अधिकाधिक रासायनिक खते वापरली जाऊ लागली . खतांची अतिरिक्त मात्रा शेतात जमीनीवर पडते . ती पुन्हा पावसामुळे वाहून नदी – नाले समुद्राला मिळते . पाणी प्रदूषित होते .
२ ) सागरी वाहतूक: आज जागतिकीकरणात जागतिक / आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले . त्यामुळे मोठ्या प्रमाणात सागरी वाहतूक चालू असते . बोटी , नावा , जहाजे यंत्रावर चालणारी जहाजे यांची संख्या प्रचंड वाढली . यामुळे इंधन गळती या वाहतूकीदरम्यान प्रचंड होते . त्यामुळे पेट्रोल , ऑईल , डिझेलच्या तवंगच्या तवंग सागरी पाण्यावर दिसतात . तसे इतर अन्य कारणामुळेही सागरी प्रदूषण वाढत आहे . मुंबईच्या सांडपाण्यामुळे माहिमची खाड़ी डासांचे कोठार बनली आहे . कारखानदारीतून बाहेर पडणारे शिशाचे कण हवेतून माती व त्यातून पाण्यात मिसळतात . अत्यंत विषारी औद्योगिक प्रदूषक म्हणजे ‘ पारा ‘ होय . हा पाराही पाण्यात मिसळतो . मिथेन , मर्क्युरी प्राणघातक असते . १ ९ ५३ ते १ ९ ६१ या काळात जपानमधील क्युशू बेटावरील मिनामाता आजार हा पाऱ्याच्या जलप्रदूषणातून निर्माण झाला होता .
३) प्लॅस्टिक , केरकचरा : जलाशयातील विसर्जन सांस्कृतिककारण इतर अनेक दैनंदिन व्यवहार , उद्योगधंद्याची वाढ यामुळे प्लॅस्टिक केरकचरा यांच्या जलाशयातील सरमिसळीमुळे जलप्रदूषण होतेच पण गणपती उत्सव , विविध गावातील यात्रा , जत्रा यामुळे देखील मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते . कारण प्लॅस्टिक , केरकचरा व इतर अशा अनेक घटकांचा प्रादूर्भाव या वेगवेगळ्या प्रसंगी विपुल प्रमाणात चालना मिळते .
४ ) इतर कारणे : वरील अनेक घटकाबरोबर विविध वीजप्रकल्प विघटनशील व अविघटनशील पदार्थ , पाळीव प्राण्यामुळे , विविध किरणोत्सारी टाकाऊ पदार्थ , युद्धे , अणुस्फोट अशी असंख्य मानवनिर्मित कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात .
जलप्रदूषणाचे अगदी डोके दुखणे , मळमळणे या साध्या परिणामापासून मृत्युपर्यंत विविध परिणाम दिसतात . त्वचारोग , कॅन्सर , कावीळ , अतिसार , आतड्यांचे विकार , धाप लागणे , श्वसन मार्गाचे विकार , पचनसंस्थेत बिघाड , चेतासंस्थेवर वाईट परिणाम , विषमज्वर , सर्दी , खोकला , असे अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात . हे मानव प्राण्यामध्ये दिसून येणारे परिणाम आहेत . मानवेतर प्राणी , वनस्पती व अजैवी घटकांवर देखील याचे विपरित परिणाम होतात . उदा . विविध प्रकारच्या पाण्यातील घटकामुळे उदा . अतिरिक्त
प्रमाणात पाण्यात अमोनिया असल्याने माशामध्ये कर्करोगाचा धोका संभवतो. पाण्यातील किटक , छोटे जीव यांच्यातील पुनर्उत्पादन क्षमता घटते . अनेक वनस्पतींची वाढ खुंटते तर काही पाणवनस्पतींची बेसुमार वाढ होते . आम्लधर्मीय पाण्यामुळे जमिनीतील कित्येक धातू पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर नजीकच्या जलसाठ्यात येऊन सजीवांत साठून राहतात . त्याला जैव संचयन असे म्हणतात . जलप्रदूषणामुळे पाण्यातील जलसंसाधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . अन्नसाखळ्यांवर विपरित परिणाम होत आहे .
PDF Name: | जल-प्रदूषण-प्रकल्प |
Author : | Live Pdf |
File Size : | 4 MB |
PDF View : | 98 Total |
Downloads : | 📥 Free Downloads |
Details : | Free PDF for Best High Quality जल-प्रदूषण-प्रकल्प to Personalize Your Phone. |
File Info: | This Page PDF Free Download, View, Read Online And Download / Print This File File At PDFSeva.com |
Copyright/DMCA: We DO NOT own any copyrights of this PDF File. This जल प्रदूषण प्रकल्प PDF Free Download was either uploaded by our users @Live Pdf or it must be readily available on various places on public domains and in fair use format. as FREE download. Use For education proposal. If you want this जल प्रदूषण प्रकल्प to be removed or if it is copyright infringement, do drop us an email at [email protected] and this will be taken down within 24 hours!
© PDFSeva.com : Official PDF Site : All rights reserved